डेक्कन एज्युकेशन सोसायटी
फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
शिष्यवृत्ती विभाग
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची सूचना
आपल्या महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील अनुदानित व विना अनुदानित विभागातील प्रवेशित अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या संबंधी अर्ज ऑनलाइन (https://swadhar.acswpune.com) या संकेतस्थळावर भरून आपल्या महाविद्यालयातील मुख्य इमारत (शिष्यवृत्ती विभागात) ऑफ लाईन पद्धतीने जमा करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात फ्रेश अॅडमिशन घेतले आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे, तसेच जे विद्यार्थी रीनेवल साठी अर्ज भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन व ऑनलाइन असे दोन्ही प्रकारे अर्ज भरायचे आहेत, ऑफलाइन भरावयाचा अर्ज आपल्या महाविद्यालयाच्या (https://www.fergusson.edu) या संकेतस्थळावर आपलोड केलेला आहे. ऑनलाइन व ऑफलाइन भरलेला शिष्यवृत्ती अर्ज व त्यासोबत जी प्रमाणपत्रे सादर करायची आहेत त्या संबंधीचा तक्ता सोबत दिलेला आहे, त्या प्रमाणे सर्व प्रमाण पत्रे अर्जासोबत जोडून शिष्यवृत्ती विभागात जमा करावे. सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज सोमवार दि. २०-१०-२०२३ पासून ३१-१०-२०२३ पर्यंत सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत जमा करावेत.
टीप : ज्या विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज भरले आहेत त्यांनी हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. जे विद्यार्थी हार्ड कॉपी शिष्यवृत्ती विभागात जमा करणार नाहीत त्यांना शासनाकडून शुल्क प्राप्ती होणार नाही, व त्याची पूर्ण जबाबदारी त्या विद्यार्थ्याची असेल.
या संकेत स्थळावर जी माहिती दिली आहे ती पूर्ण वाचूनच अर्ज भरावा तसेच, अर्जा सोबत जी कागद पत्रे सादर करावयाची आहेत त्यांची यादी सूचना फलक व ऑनलाइन महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर अपलोड केली आहे.
दिनांक : १९-१०-२०२३
प्रभारी प्राचार्य
फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे.